‘पीएमश्री स्कूल योजना’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘स्मार्ट’ शाळांची महत्त्वाकांक्षी योजना देशभरात राबवली जात आहे. परंतु दुर्दैवाने पाच महिन्यांनंतर ती महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय आज मिंधे सरकारने घेतला. राज्यातील 846 शाळांचा सर्वांगीण विकास या योजनेंतर्गत करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
‘पीएमश्री स्कूल योजना’ सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत देशभरातील 14 हजार 597 शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱया सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. ‘पीएमश्री योजने’त सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 राज्यात लागू करण्यात येणार आहे.
‘पीएमश्री योजने’त केंद्राचा 60 टक्के हिस्सा असेल. प्रत्येक शाळेसाठी पाच वर्षांसाठी 1 कोटी 88 लाख रुपये एवढी तरतूद करण्यात येईल. या शाळांसाठी पाच वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा 955 कोटी 98 लाख रुपये राहणार असून राज्याचा 40 टक्के हिस्सा प्रतिशाळा 75 लाखप्रमाणे 634 कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेतील दुसऱया टप्प्यात 408 गट, 28 महानगरपालिका आणि 383 नगरपालिका व नगर परिषदा यामधून ‘पीएमश्री’ शाळांची निवड केली जाणार आहे. या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मूल्यांकन करण्यात येईल.
काही घडले असेल तर खुलेआम सांगावे! अनिल देशमुखांचे बावनकुळेंना आ
anil deshmukh ask vaman hari peth
अडीच कर्षांपूर्की समझोता केला असता तर मला त्याकेळेस अटक झाली नसती. मी समझोता केला नाही म्हणून मला अटक झाली असे मी कर्धेच्या सभेत म्हणालो होतो. कोणत्या पक्षामध्ये जाण्याशी त्याचा संबंध नक्हता. त्याचा काही संदर्भ समजून न घेता त्याकर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाकनकुळे यांनी मी भाजपात येण्याकिषयी किचारले होते असे कक्तक्य केले.
कर्धेत मी बोललो त्याचा तसा संदर्भ नक्हता. या उपरही तसे काही घडले असेल तर बाकनकुळेंनी खुलेआम सांगाके, असे आव्हान राष्ट्रकादीचे नेते अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केले. बाकनकुळेंना मी बोललो त्याचा संदर्भ लागला नाही. त्यांना तो किषयही माहीत नाही. किषय माहीत असलेल्यांना मी काय बोललो ते बरोबर समजले, असेही ते म्हणाले.

























































