मेटेंनी केलेल्या स्वागतानंतर मुंडे समर्थक नाराज, सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांना केले ट्रोल

महाजनादेश यात्रेचे बीड जिल्ह्यात सोमवारी आगमन झाले. या वेळी विनायक मेटेंनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागतही केले. यावेळी मुंडे भगिनी गाडीतून पुढे बीडला निघून गेल्याचेही समजले. मात्र हा सर्व प्रकार पंकजा मुंडे समर्थकांना चांगलाच जिव्हारी लागला आणि त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांनाच सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केले.

एकीकडे आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांनंतर तुम्हीच माझे गुरू आहात असे वक्तव्यही केले तर दुसरीकडे मेटेंनी केलेल्या स्वागतावरून मुंडे समर्थक मुख्यमंत्र्यांवर तुटून पडलेले दिसून आले.

मुंडे समर्थकांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हणले की…’माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डबल ढोलकी वागू नका’, ‘ज्याने लोकसभेत राष्ट्रवादीचा प्रचार केला, त्याचाच तुम्हाला जास्त पुळका येतोय’, ‘मुंडे समर्थकांना एखाद्याला डोक्यावर पण घेता येते आणि त्यालाच पायाखाली देता पण येते..!!’, ‘सावधान,विधानसभा निवडणुकीत हिशोब होणार!!’ अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या