अंधेरीत बेकायदा बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर

अंधेरी पश्चिम येथील बेकायदा बांधकामांवर पालिकेने कारवाई करून बांधकामे हटवली आहेत. पालिकेच्या ‘के’ पश्चिम अंधेरी प्रशासकीय विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. यामुळे अंधेरीकरांची वाहतूककोंडीतून सुटका झाली आहे.

परीमंडळ-3चे उपआयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या निर्देशानुसार वीरा देसाई मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग, जे.पी. मार्ग व अपना बाजार परिसरात रस्ते व पदपथांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. यामुळे सार्वजनिक रस्ते व पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळाले आहे.