संभाजीनगर: दगडाने ठेचून एकाचा खून, रस्त्याच्या कडेला आढला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
b-sector-walunj-aurangabad

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बी सेक्टर मधील एका कंपनीसमोर असलेल्या ग्रीनबेल्ट जागेत दगडाने ठेचून एकाजणाचा खून झाल्याची खळबळ जनक घटना आज सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास उघडकीस आली.

वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनात वाढ होत आहे. त्यामुळे हा परिसर असुरक्षित मानला जात असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बी सेक्टर स्टलाईट कंपनी परिसरात मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या ग्रीन बेल्टमध्ये दगडाने ठेचून खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. घटनेची माहीती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिथे रक्ताने माखलेला दगड आढळला आहे. मृत व्यक्तीच्या डोक्यावर व कानावर दगडाने ठेचल्याचे निशाण होते. पोलिसांनी जखमीला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.