मुलुंडमध्ये अंधश्रद्धेतून 70 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या; दोघा भावांसह चौघांना अटक

murder-knife

समाजातील लोकांनी करणी केल्यामुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याशिवाय वडिलांच्या आत्म्यास शांती मिळणार नाही,असा समज करून घेत दोन सख्या भावांनी चौघांना सुपारी देऊन समाजातील एका 70 वर्षीय वृद्धाची हत्या केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.

मुलूंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे 70 वर्षीय वृद्ध नेहमीप्रमाणे दोन तारखेला रात्री कालजी लद्दा रोडवरील सिल्वर ग्लास दुकानासमोर झोपण्यासाठी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी ते वृद्ध रक्ताच्या थारोळ्यात आणि पोटातील आतडे बाहेर आलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलूंड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्ह्याची गंभीर दखल घेत उपायुक्त प्रशांत कदम, एसीपी पांडुरंग शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन कदम, संतोष कांबळे, विजय सांडभोर, राजगुरू, समाधान चव्हाण आदींच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. गुन्ह्याचा कसोशिने तपास करूनही हत्येमागचा थांगपत्ता लागत नक्हता. अखेर पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे कौशल्याने विचारपूस सुरू केली असता असे समोर आले की, परिसरात राहणारे दोन भाऊ त्यांच्या वडिलांच्या मृत्यूने व्यथित झाले आहेत. वडीलांच्या मृत्यूवेळी समाजातील लोकांनी दुखवटा पाळला नाही. तसेच त्यांच्या अंत्यविधीत सहभागी झाले नाही. याचा त्यांना प्रचंड राग आला आहे. शिवाय समाज व परिसरातील लोकांनी करणी केल्यामुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याचा त्यांचा समज झाला आहे.

तरच वडिलांच्या आत्म्यास शांती मिळणार
समाजातील एखाद्या व्यक्तीची हत्या केल्यावरच वडिलांच्या आत्म्यास शांती मिळेल अशी त्या दोघांची धारणा झाली होती. त्यासाठी मग त्यांनी समाजातील तीन लोकांची हत्या करण्यासाठी निवड केली. पण 70 वर्षीय वृद्ध घराबाहेर झोपण्यास जातात म्हणून त्यांनी त्यांची निवड केली. मग चौघांना 70 हजारची सुपारी देऊन वृद्धांची अत्यंत निर्घृण हत्या घडवून आणली. त्यानंतर मग पोलिसांनी दिपक मोरे (38), विनोद मोरे (30) या दोघा भावांसह आसिफ नासिर शेख, मोईद्दीन अल्लाउैद्दीन अन्सारी, आरिफ खान आणि शहानवाज या आरोपींना पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या