न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

नवी मुंबईतील पोलीस आयुक्त हद्दीत येणाऱ्या न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत पार्किंगमध्ये लवदीत नरसेम मसिह (वय 28) या तरुणाचा खून झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या संदर्भात न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेएनपीटी बंदराच्या परिसरात असणाऱ्या पार्किंगजवळ लवदीत नरसेम मसिह या तरुणाचा शनिवारी तेथील व्यक्तीबरोबर काही कारणामुळे भांडण झाले.त्या भांडणातील हाणामारीत लवदीतला दुखापत झाल्याने त्याचा रविवारी मूत्यू झाल्याची घटना घडली. आरोपी परराज्यातील असल्याने त्यांनी घटना घडल्यानंतर तेथून पळ काढला आहे. या घटनेबाबत न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक केतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे तपास अधिकारी दत्तात्रय बाजीराव किंद्रे हे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.