सुनेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून काकाने केला पुतण्याचा खून, महिलेच्या नवऱ्यालाही अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनैतिक संबंधांच्या संशयावरून चुलत्यानेच पुतण्याचा खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील येलूर येथे घडली आहे. याप्रकरणी कुरळप पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. भरदिवसा भरचौकात ही घटना घडल्याने येलूर गावात शुकशुकाट पसरला होता.

रणजित रमेश पाटील (31) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी आनंदराव सावळा पाटील (77) व अमोल आनंदराव पाटील (वय 27, दोघे रा. येलूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. प्रवीण शंकर पाटील याने फिर्याद दिली आहे.

रणजित याचे सुनेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आनंदराव व त्यांचा मुलगा अमोल यांना होता. त्यावरून काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यावेळी ती मिटविण्यात आली होती. सोमवारी दुपारी रणजित चौकात आल्यानंतर आनंदराव व अमोल या दोघांनी कोयत्याने व कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर वार केले. त्याला तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुरळप पोलिसांनी अमोल पाटील व आनंदराव पाटील यांना ताब्यात घेतले आहे.