
मुरुड म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो अथांग सागरी किनारा आणि इतिहासाची साक्ष देणारा किल्ला. येथील निसर्गाचे मनोहारी रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आणि उसळत्या चंदेरी लाटांचा अनुभव घेण्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे हजेरी लावतात. मुरुड हे तर खवय्यांचे आवडते डेस्टिनेशन. मुंबई, ठाणे व पुणेकर येतात तेव्हा आपल्या आवडत्या बोंबील, सोडे, माशांवर ताव मारतात. मुरुड महोत्सव व नाताळच्या सुट्टीत येथील खासियत असलेल्या सुक्या मासळीची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असून येथे येणाऱ्या पर्यटकांना सुकी मासळी मिळावीत यासाठी मच्छीमारांची फुल्ल टू तयारी सुरू आहे. मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या सुक्या म्हावऱ्यांचा असा नजारा पाहायला मिळत आहे. –



























































