‘मुसाकाझी’ बंदर पुन्हा गजबजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे . डी . पराडकर । संगमेश्वर

कोकणातील जलवाहतूक सुरु करण्याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष घातले असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात गजबजलेली बंदरे पुन्हा एकदा नव्याने गजबजणार आहेत. 1941 साली राजापूर तालुक्यातील मुसाकाझी बंदरावरील जेटीची उभारणी झाली. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे हा भाग सुरक्षित बंदर म्हणून विकसित होणे गरजेचे होते. सुमारे 32 वर्षापूर्वीपर्यंत हे बंदर प्रवासी बंदर म्हणून गजबजलेले होते आत्ता पुन्हा नव्याने हेच बंदर गजबजलेले असणार आहे.

मुसाकाझी बंदरातून पुन्हा भाऊच्या धक्या पर्यंत प्रवासी वाहतूक लवकर सुरू होत आहे. तशा जोरदार हालचाली शासनामार्फत सूरू झाल्या आहेत. मुसाकाझी बंदरात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डा कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रवासी वर्गाकरीता लागणा-या सर्व साहत्याची मांडणी मुसाकाझी बंदरत करण्यात आली आहे.सदर प्रस्तव त्या वेळचे बंदर निरीक्षक रामदास गवार यांनी या करीता जास्त मेहनत घेतली होती.त्याच प्रमाणे जैतापूर जेटी वर देखील सुधारणा करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणची वाहतूक जलमार्गाने मोठय़ा प्रमाणावर सुरू होती. त्यामुळे बंदरांना विशेष महत्त्व होते. कोकण किनारपट्टीवरील सर्व बंदरे व आजूबाजूच्या परिसरातील गावे गजबजलेली असायची. आज पुन्हा ही संधी कोकणाच्या वाट्याला आली आहे. पुन्हा कोकणातील सर्व बंदरे गजबजणार आहेत. त्यात मुसाकाझी बरोबर जैतापूर बंदर महत्त्वाचे मानले जात आहे. जैतापूर मधून प्रवासी वाहतूक सुरू झाल्यास जैतापूरच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे. राजापूर, पाचल,खारेपाटण,या भागातील प्रवासी पूर्वी प्रमाणे जैतापूर मधून बोटीने प्रवास करतील यात शंका नाही. तसेच आधूनिक व कमी प्रवासी वाहतुकीची बोट अल्याने पाण्याची उंची कमी लागत असल्याने जवळच्या बंदरात बोट दिमाखात ऊभी राहणार आहे. त्यामुळे बंदराची शान वाढणार असल्याने पर्यटक प्रेमी याचा फायदा घेणार आहेत.