संगीताचे तंत्रशुद्ध शिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी, संगीताच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱया शिष्यवृत्तीसाठी ख्याल, धृपद, तबला, पखवाज या क्षेत्रातील अद्ययावत प्रशिक्षणासाठी ‘नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्टस्’ आणि ‘सिटी इंडिया’तर्फे शिष्यवृत्ती योजनेची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील 18 ते 35 वर्षे वयोगटातील कलाकारांना यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. या शिष्यवृत्तीची रक्कम एक वर्षासाठी मासिक 10 हजार रुपये इतकी आहे.

कलाकारांनी आपल्या आतापर्यंतच्या शिक्षणाची माहिती [email protected] या ईमेलवर पाठवावी किंवा ‘सिटी-एनसीपीए स्कॉलरशिप फॉर यंग म्युझिशियन्स 2020-21 (हिंदुस्थानी संगीत)’ असे पाकिटावर लिहून ते नरीमन पॉइंट येथील एनसीपीएमध्ये पाठवावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी https://ncpamumbai.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

केवळ हिंदुस्थानी कलाकारांसाठीच
ख्याल, तबला, पखवाज यासाठी अर्जदाराचे वय 1 मार्च 2019 पर्यंत 18 ते 30 वर्षे, तर धृपदासाठी 18 ते 35 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. ज्या विद्यार्थ्यांना एप्रिल 2019 ते मार्च 2020 या काळात अन्य शिष्यवृत्ती किंवा संगीत शिक्षणासाठी अन्य आर्थिक मदत प्राप्त होत असेल, ते विद्यार्थी, व्यावसायिक गायक आणि वादक तसेच ज्या विद्यार्थ्यांना ‘ऑल इंडिया रेडियो’ अर्थात आकाशवाणीतर्फे ‘अ’ श्रेणी प्रदान करण्यात आली असेल, त्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही. केवळ हिंदुस्थानी नागरिकत्व असलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे.

इतर संगीत शिष्यवृत्ती
– राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती दिली जाते
– पंडित मधुकर कोठारे (लंडन) स्मृती उत्तुंग संगीत शिष्यवृत्ती 2019-20 ची घोषणा करण्यात आली आहे.
– एम. एस. सुब्बालक्ष्मी संगीत शिष्यवृत्ती. तीन वर्षांकरिता कलाकार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
– संगीताच्या शिक्षणासाठी सरकारतर्फे दोन वर्षांची शिष्यवृत्ती दिली जाते.
– चतुरंग प्रतिष्ठानकडून ‘चतुरंग संगीत शिष्यवृत्ती’ प्रदान केली जाते.