मानसिक दृष्ट्या विकलांगांसाठी कार्य करणाऱ्या ‘आधार’ संस्थेत गीतसंध्या संपन्न

680

बदलापूर येथील मानसिकदृष्ट्या विकलांगांसाठी गेल्या 26 वर्षांपासून कार्य करणाऱ्या आधार या संस्थेत गीतसंध्या संपन्न झाली. निमित्त होतं ते या संस्थेचे संस्थापक माधवराव गोरे यांच्या पुण्यतिथीचं. या कार्यक्रमाला गायनक्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

माधवराव गोरे यांनी 26 वर्षांपूर्वी बदलापूर येथे आधार या संस्थेची स्थापना केली. 4 ऑक्टोबर रोजी त्यांची पुण्यतिथी होती. त्या निमित्ताने अविरत सेवा प्रबोधिनी या संस्थेतर्फे आधारमधील मुले, कर्मचारी आणि व्यवस्थापन वर्गासाठी गीत संध्येचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात श्रीला तांबे, काहे दिया परदेसफेम मंदार पिलवलकर, केतकी कोपरकर, स्वरदा जोशी या गायकांनी आपल्या सुरांनी रंग भरले. तर मयुरेश शेर्लेकर, ओमकार जांभेकर, सुमीत देशपांडे, झंकार कानडे या वाद्यवृंदाने त्यांना साथ केली. या कार्यक्रमाला आकाशवाणीच्या रेडिओ जॉकी दुहिता सोमण यांचं निवेदन लाभलं होतं.

मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांसाठी काम करणारी आधार ही संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेची शाखा नाशिकजवळील घोटी येथे असून दोन्ही शाखांमध्ये मिळून जवळपास 400 मुलं आहेत. सध्या आधार या संस्थेची जबाबदारी विश्वास गोरे पाहत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या