महाविकास आघाडीचा ‘निश्चयनामा 2026’ जाहीर, लाडक्या बहिणींच्या नावावरील स्थावर मालमत्तेवर 50 टक्के सवलत देणार

mva nishchayanama 2026 ahilyanagar municipal election news

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने ‘निश्चयनामा 2026’ जाहीर करण्यात आला. यामध्ये शहरातील लाडक्या बहिणींच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेवर 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर नागरिकांना सन्मानाने वागवतील, त्यांची कामे करतील, असे वचन देण्यात आले आहे.

दरम्यान, अहिल्यानगरकरांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व मान्य आहे. मात्र, गुजरातचे जातीभेद करणारे हिंदुत्व मान्य नाही. हिंदुत्व नीलेश लंकेच्या रक्तात आहे, राजकीय पोळी भाजण्यासाठीचे ते हिंदुत्व नव्हे. राजकारण सहनशीलतेने करत आहोत, दादागिरी-दहशत केली तर माझ्याशी गाठ आहे, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी आपल्या भाषणात दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे, प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, नीलेश मालपाणी, प्रा. सीताराम काकडे, नामदेव पवार, गोविंद मोकाटे, संजय झिंजे, आरिफ शेख, मनोज गुंदेचा, गिरीश जाधव, अभिजित ससाणे, बाळासाहेब भंडारी, फारुक रंगरेज आदींसह तीनही पक्षांचे पदाधिकारी व उमेदवार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

खासदार लंके म्हणाले, महाविकास आघाडी राजकारण सहनशीलतेने करत आहे. मात्र, दादागिरी, धमकी व दहशतीचा प्रयत्न झाला, तर माझ्याशी गाठ आहे. आघाडीतील नेत्यांवर दडपशाही करणे, व्यवसायावर कारवाई करणे, खोटे गुन्हे दाखल करणे व वैयक्तिक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. आम्हाला हात जोडताही येतात आणि वेळप्रसंगी भायापणही वर करता येतात. काचेच्या घरात राहणाऱयांनी आमच्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. कार्यकर्ते व उमेदवारांवर गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना डांबर व खडी कोणी खाल्ली, असा सवाल केला. सावेडीतील नाटय़ संकुलाचा परिसर दारू व जुगाराचा अड्डा बनल्याची टीका त्यांनी केली. रस्त्याच्या कामात 300 कोटींपेक्षा जास्त भ्रष्टाचार झाल्याबाबत चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. खोटय़ा गुह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर करून ताबेमारी करण्यात आली. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास अतिक्रमित भूखंड मोकळे करून उद्याने उभारली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, अभिजित ससाणे यांनीही सत्ताधाऱयांचा खरपूस समाचार घेतला.

या बातमीसाठी इंग्रजी छोट्या लिपीमध्ये SEO लिहून द्या.