
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी N95 मास्क प्रभावी असल्याचे इस्रोच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. तसेच व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मास्क लावणे गरजेचे असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हवेच्या माध्यमातून विषाणूचा प्रादुर्भाव जास्त होते असेही वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
इस्रोचे पद्मनाभ प्रसन्ना सिम्हा राव यांनी खोकल्यापासून विषाणूंचा जो प्रादुर्भाव होतो त्याचा अभ्यास केला आहे. कोरोना व्हायरस रोखण्यात N95 मास्क सर्वाधिक प्रभावी असल्याचा निष्कर्ष त्यांनी अभ्यासातून काढला आहे.
खोकला आणि शिकेंमुळे जे विषाणू पसरतात N 95 मास्कमुळे त्याचा प्रभाव 10 पटीने कमी होतो. तसेच त्याचा प्रसार 0.1 ते 0.25 मीटरपर्यंतच सीमीत राहतो. जर तुम्ही मास्क नाही लावला तर हा विषाणू तीन मीटरपर्यंत पसरू शकतो. एक साधारण मास्कही हा वेग 0.5 मीटरपर्यंत कमी होतो.
सिम्हा म्हणाले की एखादा मास्क विषाणूचे सर्व कण फिल्टर नही करू शकत पण त्याच प्रादुर्भाव नक्की रोखू शकतो. जर तुमच्याकडे चांगल्या दर्जाचा मास्क नसला तरी चालेल कारण कुठलाही मास्क विषाणूचा प्रादुर्भा रोखण्यासाठी मदत करतोच.




























































