‘नाडा’ने बोर्डाच्या परवानगीनंतरच क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी घ्यावी!

3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राष्ट्रीय उत्तेजक सेवनविरोधी एजन्सीने (नाडा) हिंदुस्थानी क्रिकेटपटूंची उतिजक सेवन चाचणी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पूर्वपरवानगीनंतरच घ्यावी अशी मागणी बीसीसीआयने केली आहे. ‘नाडा’च्या हाती क्रिकेटपटूंच्या उत्तेजक सेवन चाचणीची सर्व सूत्रे सोपवण्यास बोर्डाचा विरोध आहे. त्यामुळे ही चाचणी कोणत्या स्पर्धांच्या वेळेस घ्यायची याचा निर्णय क्रिकेट बोर्डच घेणार आहे. शिवाय ही चाचणी बीसीसीआयचे ऍण्टी डोपिंग व्यवस्थापकांच्या उपस्थितीतच घेण्याचा बोर्डाचा आग्रह आहे. मात्र देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरू झाल्यावर ‘नाडा’ क्रिकेटपटूंच्या उत्तेजक देवाण चाचणीला सुरुवात करणार आहे. बीसीसीआयने या नियमित कार्यक्रमाला विरोध केल्यास ‘नाडा’ आयसीसीला निगेटिव्ह अहवाल देईल, असा इशारा ‘नाडा’ने क्रिकेट बोर्डाला दिला आहे.