नागपूर – विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

127

नागपूरच्या पारशिवनी वनपरिक्षेत्रातील टेकाडी शिवारातील ईश्वर गिरधर मांडारे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सकाळी एक वर्षाच्या बिबट्या पडलेला आढळून आला. त्याला अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बिबट्या विहिरीत पडलेला आढळून आल्यानंतर याची सूचना स्थानिकांनी वन्यजीव रक्षक यांना दिली. सूचना मिळताच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. ऑपरेशन बिबट राबवून त्याला विहिरीतून बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली. सकाळी 11.30 वाजता कारवाई सुरू करून 12.20 वाजता बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश प्राप्त झाले.

आपली प्रतिक्रिया द्या