
नगर शहरात धुमाकुळ घातलेल्या सराईत सोनसाखळी चोर तसेच जबरी चोरी करणारे गुन्हेगार कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद केले आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी आठ मोबाईल, टीव्हीएच अपाची गाडी, बुलेट मोटारसायकल असा ऐवज जप्त केला आहे. आरोपीमध्ये राजु रामय्या दास, रामा मधुकर खंडागळे, नयन राजेंन्द्र तांदळे असे आहेत. तर एक आरोपी पळून गेला आहे त्याचे नाव भुषण बबन ससे असे आहे.
मिळालेली माहिती अशी की, 19 डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच सदर घडले ठिकाणी उपयिमागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके सो यांनी भेट देवुन गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचेकडे दिल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांचे पथकाने तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कर्मचारी आरोपी यांचा शोध घेतला असतांना गुप्त बातमीदारांना मार्फत द्यातमी मिळाली की, सदरचा गुन्हा सराईत गुन्हेगार राजु रामय्या दास याला ताब्यात घेतले. त्याला विचारपुस केली असता त्यांने कबुली दिली की, सदरचा गुन्हा मी व माझे साथीदार नयन राजेन्द्र तांदळे, रामा मधुकर खंडागळे अश्यांनी मिळुन केला आहे.


































































