मधमाशांच्या हल्ल्यात तीस जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथे वर्षश्राद्ध कार्यक्रमात शुक्रवारी अचानक आग्यामोहोळाच्या मधमाश्या चावल्याने जवळपास पंचवीस ते तीस जणांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली आहे. शहराच्या नाथनगर विभागात राहणाऱ्या अमोल खेडकर यांना नगरला हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारेगाव येथे मोहटादेवी रोडवर असलेल्या मूकबधिर विद्यालयाच्या समोर वडाच्या झाडाखाली शुक्रवारी सकाळी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमातील पूजेच्या वेळी लावण्यात आलेल्या अगरबत्तीच्या धुराने वडाच्या झाडाच्या फांदीला असलेले आग्यामोहोळातील मधमाश्या उठल्या व त्यांनी उपस्थित लोकांना चावा घेण्यास सुरवात केल्याने एकच गोंधळ उडाला. या कार्यक्रमास जवळपास दोनशे ते अडीचशे लोक उपस्थित होते. काही जणांनी जवळच असलेल्या मुकबधीर विद्यालयात आसरा घेतल्याने ते बचावले मात्र २५ ते तीस जणांना मात्र मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तर या घटनेत अमोल खेडकर या तरुणाला मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नगरला हलवण्यात आले आहे.