नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक

266

कला शिक्षण या पदावर नियुक्त करण्याचे आमिष दाखवून एका तरुणांची 6 लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना नगरमधील भिंगार परिसरात घडली आहे. हरेश्‍वर सारंधर साळवे असे फसवणूक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिंगार परिसरातील सैनिक नगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे यासाच्यसह संस्थेच्या सात पदाधिकाऱ्यांनी हरेश्‍वर साळवे यांना कला शिक्षक या पदावर नियुक्ती करतो, असे सांगत मुलाखत घेऊन तात्पुरत्या स्वरूपाची ऑर्डर दिली व वेळेवर पगार मिळण्याची हमी दिली. त्यानंतर त्यांनी संगनमत करून हरेश्‍वर साळवे यांच्याकडून 6 लाख रूपये घेतले व शासनाची ऑर्डर मिळवून देऊ असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हरेश्‍वर यांना कोणत्याही प्रकारचे मानधन व पगार न देता त्यांची फसवणुक केली. हरेश्‍वर यांनी पगाराची मागणी केली असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा दम दिला. याप्रकरणी हरेश्‍वर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, 406, 34, 506 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तापास करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या