केडगावमध्ये बिबट्या, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

252
leopard

गेल्या महिन्यापूर्वी बुरुडगाव परिसरात बिबट्या आल्याची चर्चा होती. त्यानुसार वनविभागाने पाहणी केली होती. परंतु, बिबट्याचे ठसे आढळून आले नाही. गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास व शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास केडगाव परिसरातील रेल्वे उड्डाणपूल-देवी रस्त्यावर बिबट्याने दिसल्याने नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान, वनविभागाच्या पथकाकडून केडगाव परिसराची पाहणी केली जात आहे. जंगल कमी होत चालल्याने बिबट्याने शिकारीसाठी शहरी भागात धाव घेतल्याचे चित्र गेल्या काही वर्षापासून पहावयास मिळत आहे. पारनेर परिसरातील निघोज, टाकळी हाजी, अळकुटी, शिरापूर, रांधे परिसरात नेहमीच बिबट्या पाहण्यात येत आहे. तसेच गेल्या महिन्यापूर्वी नगर शहर परिसरातील बुरुडगाव रोड परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होती. नागरिकांच्या मागणीनुसार आठ दिवस वन विभागाचे अधिकारी बिबट्याचा शोध घेत होते.

आपली प्रतिक्रिया द्या