
सामना प्रतिनिधी। नगर
येथील कल्याणरोड वरील आयएमए भवनासमोर असलेल्या वेद पाठशाला, वारकरी शिक्षणासाठी असलेल्या आराधना ज्ञानपीठमध्ये रेणुका माता प्रगटदिन सोहळा काल पासून प्रारंभ झाला, माहूरगड नंतर असा प्रगटदिन सोहळा शतचंडी महायज्ञ सोहळा प्रथमच होत आहे. यापार्श्वभूमीवर आज दुसऱ्या दिवशी मंदिरात आंबा उत्सव संपन्न झाला.
यावेळी सर्व मंदिरात सजावट करण्यात आली होती. तसेच , देवीची मूर्ती आंब्यांनी सजविण्यात आली होती. यासाठी भाविकांनी आज हापूस आंबे आणले होते. वेदमूर्ती बाळासाहेब कांबळे गुरुजी,वेदमूर्ती त्रैलोक्य कांबळे गुरुजी यांच्यासह 11 पुरोहितांनाही सकाळी देवता पूजन,शिवशक्ती पूजन,सप्तशती पाठ सुहासिनी,कुमारिका व बटू पूजनसह अनेक विधी केले. नंतर दुपारी फळाचर्न दीपाचर्न,राजोपचार सेवा, महाआरती व प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
































































