महापौर पदासाठी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mayor-election

सामना प्रतिनिधी । नगर

महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून उमेदवारांचे अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे, भारतीय जनता पार्टीकडून बाबासाहेब वाकळे यांनी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संपत बारस्कर यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून गणेश कवडे, भाजपकडून मालन ढोणे व कॉंग्रेसच्या रुपाली वारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. युतीवर अद्याप कुठलाही अंतिम निर्णय जाहीर झालेला नसल्याने महापौर कुणाचा होणार हे सभागृहातच स्पष्ट होणार आहे.