नगरमध्ये रंगणार राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शुक्रवार, दिनांक 3 जानेवारीपासून 65व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेची मेजवानी नगरकर क्रीडारसिकांना मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सज्ज झाले असून स्पर्धेसाठी येणार्‍या खेळाडूंच्या स्वागतासाठीही नगरकर क्रीडारसिक सज्ज झाले आहेत.

देशभरातून 35 संघ या स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधा अद्यावत करण्यात आला असून परिसरही बॅडमिंटनमय झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक बॅडमिंटन असोसिएशन, विविध क्रीडा संघटना आणि क्रीडा रसिक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर यांनी दिली.