
सामना प्रतिनिधी । नगर
केडगावमध्ये गुरुवारी पहाटे आणि त्यानंतर काही तासातच असे लागोपाठ दोन अपघात घडले. यामध्ये युवक व युवतीला अवजड वाहनांनी चिरडले. यामुळे संतप्त नागरिकांचा नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करत वाहतूक अडवून धरली.
नगर शहरामध्ये अवजड वाहतुकीचा विषय चांगलाच गाजत चालला आहे. आज दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करून नगर पुणे महामार्गावर केडगाव येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. विठ्ठल अनभुले, अनामिक गायकवाड अशी दोन मृतांची नावे आहेत.
नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते साधारणतः चार ते पाच हजार वाहने नगर शहरातून जात असतात. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत तर दुसरीकडे अवजड वाहतूक सर्रासपणे सुरू ठेवण्यात आली आहे. गावातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू केल्यामुळे या आधीही अनेक वेळा अपघात झाले आहेत. अनेक वेळा आंदोलने होऊन देखील याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिक संतापले आहेत.
























































