दे धक्का! नगरमधील आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

nagar-corporators

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना शिवसेनेने मुसंडी घेतली आहे. नगरमधील काँग्रेस आघाडी, मनसेसह भाजपच्या विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने साऱ्याच पक्षांना धक्का बसला. मुंबईतली रंग शारदा येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला.

भाजपाचे विद्यमान नगरसेवक गटनेते दत्ता कावरे, राष्ट्रवादीचे बिनविरोध नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सुभाष लोंढे, मनसेचे पदाधिकारी गिरीश जाधव, बोल्हेगाव येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता सप्रे तसेच सावेडी येथील उद्योजक सुमित कुलकर्णी यांनी आज भगवा ध्वज आपल्या खांद्यावर घेत पक्षप्रवेश केला.

आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील रंगशारदा भवनमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड हे देखील उपस्थित होते. तसेच जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते सभागृहनेते गणेश कवडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, राजेंद्र दळवी रवी वाकळे, मदन आढाव, विशाल वालकर, मुन्ना भिंगार, दिवे अजय भोयर या सह पदाधिकारी उपस्थित होते.