राज्य कर निरिक्षक यांच्यासह दोघांना लाच घेताना अटक

369

कृषी सेवा केंद्राच्या जीएसटी खात्याला झालेला दंड हा तडजोड करुन देतो, असे सांगून राज्य कर निरिक्षक विशाल भोर तसेच खाजगी व्यवसायी निलेश बांगर यांना 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्राचे जीएसटी खाते काढलेले होते. परंतु मागील दोन वर्षापासून त्यांचा व्यवसाय बंद होता. त्यांना आकारण्यात आलेला दंड हा 1 लाख 13 हजार न भरता त्यांचे जीएटी खाते बंद करण्यासाठी आरोपी राज्य कर निरीक्षक विशाल भोर यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यामध्ये तडजोड करुन देतो असे सांगितले. सदरची रक्कम ही 15 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथे राहणारे निलेश बांगर यांच्याकडे सदरची रक्कम द्यावी असे निश्‍चित केले होते.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर बेल्हे येथील बांगर असोसिएशन या ठिकाणी सापळा रचून 15 हजारांची लाच घेताना पकडले. तर यातील आरोपी कर निरिक्षक यांना नगरच्या जीएसटी कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या