जामखेड रोडवर अपघात; एक ठार

999

जामखेड रोड वर नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ते आठवड गावादरम्यान मालट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत नगर तालुक्यातील आठवड येथील रहिवासी व आठवड विविध कार्यकारी सेवा सोसायटी सचिव विजय सहदेव दाताळ (वय 45) हे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा रस्त्याच्या बाजूला फेकला गेल्याने सुदैवाने बचावला आहे. मंगळवारी (दि.24) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

आठवड विविध कार्यकारी सेवा सोसायटी सचिव विजय सहदेव दाताळ हे मोटारसायकलवर (क्र.एम एच 16, पीजी 8896) मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास चिचोंडी पाटीलकडुन आठवडकडे आपल्या मुलासह जात गॅस टाकी घेऊन जात होते. गावात जाणार्‍या रस्त्याकडे वळत असतांना जामखेडकडुन येणार्‍या मालट्रकची त्यांच्या मोटारसायकलला धडक बसली. मालट्रकच्या चाकाखाली सापडुन विजय दाताळ हे जागीच ठार झाले. तर त्यांचा पाठीमागे बसलेला मुलगा रोहित विजय दाताळ (वय 15) हा उडुन रस्त्याच्या बाजूला फेकला गेल्याने बचावला आहे. तो जखमी झाला असून त्यास उपचारासाठी नगरच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नगर तालुका पोलिस ठाण्यास खबर दिल्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून दाताळ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. दाताळ यांचे अपघाती निधनाची बातमी गावात पसरताच शोककळा पसरली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला

आपली प्रतिक्रिया द्या