अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

जिल्हा निवडणूक विभागाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार आता जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या 33 लाख 93 हजार 88 इतकी वर आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी 74 हजार 533 मतदारांची संख्या वाढली आहे. .

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत जिल्ह्यात छायाचित्र मतदार याद्यांचा कार्यक्रम राबविला गेला. मतदार यादी बिनचूक व्हावी आणि मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये. या 1 सप्टेंबर 2018 पासून सलग दोन महिने छायाचित्र मतदार याद्यांचा कार्यक्रम राबविला गेला. या कार्यक्रमात 1 लाख 5 हजार नवीन मतदार नोंदणी केली गेली. दुबार, मयत आदींची वगळणी करुन, बारा विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी जिल्हाभरातील सर्व मतदान केंद्र, तहसील, उपविभागीय कार्यालये आदी ठिकाणी नागरिकांना ही मतदान यादी पाहण्यासाठी उपलब्ध केली आहे. जिल्हाभरात मतदारसंख्या आता 33 लाख 93 हजार 88 इतकी झाली आहे. यामध्ये पुरुष मतदारसंख्या 17 लाख 71 हजार 281 तर महिला मतदारांची संख्या 16 लाख 21 हजार 672 इतकी आहे. आता लोकसभा निवडणुकीसाठी हीच मतदार यादी वापरली जाणार आहे. इतर मतदारांत 135 जणांचा समावेश आहे. अकोले, जिल्ह्यातील मतदार यादीत 99.94 टक्के निवडणूक ओळखपत्र असलेले (इपिक रेशो) तर मतदार यादीत छायाचित्र असलेल्या मतदारांची टक्केवारी 99. 93 इतकी नोंदविली गेली आहे. शिर्डी, श्रीरामपूर व शेवगाव-पाथर्डी या तीन विधानसभा मतदारसंघांतील मतदार यादीत मात्र शंभर टक्के मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र आहे.

विधानसभा मतदार संघनिहाय मतदार.

अकोले 250723.
संगमनेर 264158.
शिर्डी 257096 .
कोपरगाव 256868.
श्रीरामपूर 279576 .
नेवासा 253129 .
शेवगाव-पाथर्डी 333422 .
राहुरी 284396 .
पारनेर 313474 .
नगर शहर 280500 .
श्रीगोंदा 307334 .
कर्जत-जामखेड 312412.