पुलवामाचा हल्ला म्हणजे छुप्पे युद्धच – ऍड. निकम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नागपूर

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला हे एकप्रकारे छुप्पे युद्धच आहे. त्यामुळे या प्रकरणात कुठेलीही सौदेबाजी करताना फार काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील. ठोस तर्पपूर्ण निष्कर्षांसह आपली बाजू मांडावी लागेल. तेव्हाच जगाला सत्य काय ते पटवून देऊ शकतो असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित ‘जस्टा कॉजा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जगासमोर या हल्ल्याचे खरे रूप आणायचे असेल तर कुठलीही हयगय करून चालणार नाही असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीची उमेदवारी धुडकावली

जळगाव मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी फेटाळली आहे. सध्या निवडणूक लढविण्याचा कुठलाही विचार नसल्याचे निकम यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले.