नागपूरमध्ये ट्रकने तीन विद्यार्थ्यांना चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूर जिल्ह्यातील भिवापूरमध्ये भरधाव ट्रकने तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये सुंगधा धनराज पिंपळकर यांचा समावेश आहे. तर ऐश्वर्या बोडके गंभीर जखमी असून तिला नागपूरच्या मेडिकल हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथील विद्यार्थी सायकलने महाविद्यालयात जात असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. घटनेनंतर वाहनचालकाने पोबारा केला आहे. घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी टायर जाळून चक्काजाम आंदोलन केल्याने परिसरात तणाव होता. आंदोलनामुळे भिवापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील आग विझवत संतप्त जमावाला शांत केले.