विदर्भवाद्यांच्या ‘बंद’चा डब्बा गुल, बाजारपेठ खुली ठेवून जनतेने झिडकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नागपूर

विधिमंडळाचे अधिवेशन असले की स्वतंत्र विदर्भाच्या पिपाण्या वाजू लागतात. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भवाद्यांनी नागपूर बंद पुकारला होता. मात्र जनतेने सर्व व्यवहार खुले ठेवून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे स्वप्न पाहणाऱया विदर्भवाद्यांना साफ झिडकारले. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून आंदोलनातील हवाच काढून घेतली.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भवाद्यांनी नागपूर बंद पुकारला होता. बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळणार अशा फुशारक्याही विदर्भवाद्यांनी मारल्या होत्या. माजी आमदार वामनराव चटप, राम नेवले आदींनी विविध भागांत फिरून बंदचे आवाहन केले. मात्र त्याला बाजारपेठेचा प्र्रतिसाद मिळाला नाही. उलट बंदचे आवाहन करत असतानाच पोलिसांनी विदर्भवाद्यांची धरपकड केली. त्यामुळे आंदोलनाचा डबाच गुल झाला. सरकार आंदोलनाची गळचेपी करत असल्याचा कांगावा विदर्भ राज्य आघाडीचे राम नेवले यांनी केला.