नागपुरात 15 मार्चपासून लॉकडाऊन आठवडाभर संचारबंदी, पालकमंत्री राऊत यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन 15 ते 21 मार्चपर्यंत शहरात कडक ‘लॉकडाऊन’ची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून विनाकारण फिरताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे.

काय सुरू राहणार

  • बँक, पोस्ट, भाजीपाला, अंडी-मांस-मच्छी आणि चष्मा दुकाने.
  • उद्योग
  • शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थिती.
  • मार्च एंडिंगची कामे पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
  • लसीकरण सुरू राहणार.
  • वैद्यकीय, पॅरामेडिकल व अत्यावश्यक सेवा.
  • खाद्यपदार्थ आणि मद्याची घरपोच सेवा सुरू राहील. मात्र ओळखपत्र गरजेचे.

काय बंद राहणार

  • खासगी कार्यालये बंद
  • मद्यविक्री दुकाने बंद
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार