
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला कोरोनाचा विळखा पडताना दिसत आहे. नागपुरात कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत असून अवघ्या 12 तासात एकूण 9 रुग्ण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे नागपूरची एकूण रुग्ण संख्या 56 वर गेली असून यामध्ये 8 रुग्ण बरे तर एक मृत झाला आहे. एकूण 47 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली असून तबालिगी जमातच्या संपर्कात आल्यामुळे आकडा वाढला अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.




























































