विमानाला पक्षी धडकला; 150 प्रवासी बचावले!

नागपूरहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच पक्ष्याला धडकल्याने रद्द करण्यात आले आहे. या घटनेत तब्बल 150 प्रवासी वाचले आहेत. पक्षी विमानाला धडकल्याचे लक्षात येताच वैमानिकांनी त्वरित विमान नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विमानाची तपासणी करण्यात आली असता पक्ष्याच्या धडकेमुळे विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. ही दुरुस्ती करण्यास जास्त वेळ लागणार असल्याने हे उड्डाणच रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.