निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरण पुढील सुनावणीला हजर राहा, फडणवीस यांना नागपूर न्यायालयाचे आदेश

581
devendra-fadnavis

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या सत्र न्यायालयाने शेवटची संधी दिली आहे. फडणवीस यांना न्यायालयात मंगळवारी अनुपस्थित राहण्याची मुभा देण्याची विनंती ऍड. उदय डबले यांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करीत पुढील सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुह्यांची माहिती लपविल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज ऍड. सतीश उके यांनी न्यायालयात केला. फडणवीस मुंबई येथे होणाऱया व्यवसाय समितीच्या बैठकीत व्यस्त आहेत. त्यामुळे आज ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाही. या प्रकरणावर पुढील तारीख देण्याची विनंती ऍड. उदय डबले यांनी न्यायालयाला केली. यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यानसुद्धा फडणवीस यांनी अनुपस्थित राहण्याबाबत मुभा देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने फडणवीस यांना शेवटची संधी देत या प्रकरणावर 20 फेब्रुवारीला सुनावणी ठेवली.

आपली प्रतिक्रिया द्या