नागपुरात सहा प्रवाशांसह जीप वाहून गेली, तिघांचे मृतदेह सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावनेर तालुक्यातील नांदा गावाजवळ एक स्कॉर्पिओ प्रवासी जीप नाल्याच्या पुरात वाहून गेली. त्यात सहा प्रवासी होते. सायंकाळपर्यंत तिघांचे मृतदेह सापडले होते. उर्वरितांचा शोध सुरू आहे. सापडलेल्या मृतदेहांमध्ये एक महिला, एक पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे. हे कुटुंब नांदा येथे आले होते आणि मध्य प्रदेशातील मूलताई येथे परत चालले होते. ब्राह्मणआळी पुलावर पाणी आलेले असतानाही जीप पुढे नेल्याने हा दुर्दैवी अपघात झाला.