फडणवीसांना नडले होते, सतीश उकेंसह सहा जणांना मोक्का; नासुप्रची जमीन हडपण्याचे प्रकरण

नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीची बाभुळखेडा येथील सिलिंगची 1 एकर जमीन बनावट दस्तावेजावर हडपल्याप्रकरणी वादग्रस्त वकील सतीश महादेवराव उके, त्यांचे बंधू प्रदीप उके यांच्यासह सहा जणांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक माहिती आहे. उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

 अन्य आरोपींमध्ये श्रीरंग हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष सुभाष मणिलाल बघेल, चंद्रशेखर नामदेवराव माटे, माधवी प्रदीप उके, शेखर महादेवराव उके आणि मनोज महादेवराव उके यांचा समावेश आहे.

 नासुप्रचे (दक्षिण विभाग) विभागीय अधिकारी पंकज पाटील यांच्या तक्रारीवरून 5 जानेवारी 2023 रोजी या सर्व सहाही जणांविरुद्ध  120 (ब), 420, 423, 424, 465, 467, 468, 471 आणि 474 कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच गुह्यात मोक्काची ही कारवाई वाढवण्यात आली आहे.