नागपूर – वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर जिल्हयाध्या  पारशिवणी तालुक्यातील आदिवासी भागातील घाटपेंढरी येथील शिवारात आदिवासी व्यक्तिवंर  वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना 13 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता घडली.आनंदराव उईके (56) असे मृतकाचे नाव आहे.

घाटपेंढरी गाव हे आदिवासी व जंगली भाग असून, सध्या येथे रोजगार नाही. त्यामुळे आनंदराव उईके हा 13 एप्रिल रोजीच्या सकाळी जंगलात पत्नी व काही सहकार्‍यांसोबत मोहफुल गोळा करण्याकरीता गेला होता. आनंदराव यांच्या मोहफुल वेचनी झाडाच्या शेजारी वाघ बसला होता. परंतु, याची जाणीव आनंदरावास नव्हती. त्यामुळे तो मोहफुल वेचण्यात धुंदीत होता.दरम्यान, आनंदरावास एकटा पाहून वाघाने त्याच्या मागून हल्ला केला आणि त्याला जंगलात घेऊन गेला.ही घटना पत्नी भुतेबाई उईके व सहकारी यांना दिसली. त्यामुळे ते घाबरून गावात गेले व नातेवाईक व गावकर्‍यांना त्यांनी आपबीती सांगितली. तसेच पारशिवनी पोलिस व वनविभागाला माहिती दिली. गावकरी, पारशिवनी पोलिस, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी वाघाचे नमुने उमटल्याचे दिसून आले. त्यावरून त्याची वाघाने शिकार केल्याच्या खात्री झाल्याने शोध सुरू केला. त्याचा शोध घेतला असता आनंदराव मृतावस्थेत सायंकाळी जंगलात आढळून आला.पारशिवनी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे मृतदेह नेण्यात आले. वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. आनंदराव यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.