नालासोपारा येथे आरोग्य शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री. नरसिंह के. दुबे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि धर्मादाय हॉस्पिटलच्या वतीने संस्थेचे संस्थापक दिवंगत नरसिंह दुबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 28 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत कॉलेजमध्ये भावपूर्ण पुण्यस्मरण आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्त तपासणी, नेत्र तपासणी, कॅल्शियम तपासणी यांसारख्या चिकित्सा विनामूल्य करण्यात येतील. तसेच वाजवी दरात चष्मा वितरण आणि मोतिबिंदू ऑपरेशनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष जयप्रकाश दुबे, संचालक डॉ. ओमप्रकाश दुबे यांनी केले आहे.