इस्लामपूर नाही आता ‘ईश्वरपूर’

महाराष्ट्रातील सांगली जिह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून आता ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेने या प्रस्तावाला मान्यता दिली असून इस्लामपूरचे नाव अधिकृतपणे बदलले आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. छाननी आणि जागेची पडताळणी केल्यानंतर भारतीय सर्वेक्षण संस्थेने नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.