देशभरातून नरेंद्र मोदींची हवा संपली – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक कल्याणकारी योजना राबिवण्यात येत आहेत. मागील भाजप सरकारपेक्षा जास्त मदत अवघ्या एका वर्षात केली. देशभरातून नरेंद्र मोदींची हवा आता संपली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्ला चढवला.

सरकारने केलेल्या कामाची, विविध योजनांची माहिती गावागावात पोहोचवण्याचे काम करा, अशी सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केली.यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी नाना पटोले बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱयांच्या हिताचे निर्णय घेत महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबिवली. अवकाळीचे नुकसान होताच 10 हजार कोटी रुपयांची मदत दिली. सरकारने केलेल्या कामाची, विविध योजनांची माहिती गावागावात पोहोचवण्याचे काम करा, असे नाना पटोले म्हणाले.

नागपूरचा 55 वर्षांचा भाजपचा बालेकिल्लाही विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला आहे. पुण्याची जागाही काँग्रेसने जिंकली. ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले आहे. लोकांचा हा विश्वास कायम ठेवून जोमाने काम केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अधिक सोपा होईल, असे नाना पटोले म्हणाले.