
कोरोना विषाणू संसर्गामुळे आज पाच जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ४३१ एवढी झाली आहे. आज १३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १६४५२ एवढी झाली आहे.
आज दयानंदनगर येथील ८० वर्षीय महिला, भोगाव ता.अर्धापूर येथील ६० वर्षीय पुरुष, दत्तनगर नांदेड येथील ६५ वर्षीय पुरुष, कंधार येथील ६५ वर्षीय महिला, निवघा ता.मुदखेड येथील ६५ वर्षीय पुरुष अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
आज ७९८ रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ६५५ जणांचे रिपोट निगेटीव्ह आले आहेत तर आज १३१ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळले असून त्यामुळे एवूâण रुग्णसंख्या १६४५२ वर पोहंचली आहे.
आज नांदेड महापालिका क्षेत्रात ८०, अर्धापूर १, किनवट ४, धर्माबाद १, नांदेड ग्रामीण ३, परभणी ३, हिंगोली ३, देगलूर ५, कंधार ४, बिलोली १, लोहा १२, हदगाव ३, मुखेड ९,नायगाव ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज २०० कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे वाटू लागल्याने सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उपचार घेवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १३००८ एवढी झाली आहे. आता वेगवेगळ्या कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात मिळून २९१३ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी ६५ जणांची प्रकृती गंभीर आहे.





























































