नांदेड – 9 विधानसभा मतदारसंघात 135 उमेदवार, ‘येथे’ होणार चुरशीच्या लढती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर जिल्ह्यात आता नऊ विधानसभा मतदारसंघांत 135 उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात (38) तर सर्वात कमी उमेदवार मुखेड मतदारसंघात (5) आहेत. सर्वाधिक उमेदवार असलेल्या भोकर मतदारसंघात आज 84 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे फक्त 7 उमेदवार रिंगणात आहेत.

जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. आज दुपारी 3 वाजेनंतर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत आता एवूâण 135 उमेदवार रिंगणात आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात एकूण 147 अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती 49 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर 91 उमेदवार रिंगणात होते. आज 84 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी केवळ 7 उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात छाननीअंती 62 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आज 34 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्ह्यात या मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार रिंगणात आहेत. त्याखालोखाल नांदेड उत्तर मतदारसंघात 56 उमेदवार होते. तेथे 32 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात आता 24 उमेदवार रिंगणात आहेत. किनवट विधानसभा मतदारसंघात 25 पैकी 10 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने तेथे 15 उमेदवार रिंगणात आहेत. हदगाव विधानसभा मतदारसंघात 30 उमेदवारांपैकी 15 जणांनी माघार घेतल्याने तेथेही 15 उमेदवार रिंगणात आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघात 21 पैकी 11 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे 10 उमेदवार रिंगणात आहेत. देगलूर विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवारांपैकी 5 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. तेथे 9 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वात कमी उमेदवार मुखेड विधानसभा मतदारसंघात असून, तेथे 9 पैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने केवळ 5 उमेदवार रिंगणात आहेत. नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 19 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता तेथे 12 उमेदवार रिंगणात आहेत. एवंâदर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत 135 उमेदवार रिंगणात आहेत.

प्रमुख लढती –
भोकर – अशोकराव चव्हाण (काँग्रेस), बापूसाहेब गोरठेकर (महायुती), नामदेव आयलवाड (वंचित बहुजन आघाडी)
नांदेड दक्षिण – राजश्री हेमंत पाटील (महायुती), मोहनराव हंबर्डे (काँग्रेस), साबेर चाऊस (एमआयएम), फारुख अहमद (वंचित बहुजन आघाडी), दिलीप कुंदकुर्ते (अपक्ष-भाजपा बंडखोर),
हदगाव – आमदार नागेश पाटील आष्टीकर (महायुती), माधवराव पाटील पवार (काँग्रेस),
लोहा – अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे (महायुती), श्यामसुंदर शिंदे (शेकाप), दिलीप धोंडगे (राष्ट्रवादी काँग्रेस)
देगलूर – आमदार सुभाष साबणे (महायुती), रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस), रामचंद्र भरांडे (वंचित बहुजन आघाडी),
नांदेड उत्तर- बालाजी कल्याणकर (महायुती), आमदार डी.पी. सावंत (काँग्रेस), फेरोज लाला (एमआयएम), मुकुंद चावरे (वंचित बहुजन आघाडी),
मुखेड- आमदार डॉ. तुषार राठोड (महायुती), भाऊसाहेब मंडलापूरकर (काँग्रेस), जीवन दरेगावे (वंचित बहुजन आघाडी), किनवट- प्रदीप जाधव नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस), भीमराव केराम (महायुती), प्रा. डॉ. हेमराज उईके (वंचित बहुजन आघाडी),
नायगाव- राजेश संभाजी पवार (महायुती), आमदार वसंतराव चव्हाण (काँग्रेस), मारोतीराव कवळे (वंचित बहुजन आघाडी)