श्री विठ्ठल रखुमाईसाठी 1 कोटी रुपयांचा सोन्याचा मुकूट, उमरी येथील माजी नगराध्यक्षांची देणगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड जिल्ह्यातील उमरीचे माजी नगराध्यक्ष व आर्यवैश्य समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईसाठी 1 कोटी रुपयांचे शुद्ध सोन्याचे दोन मुकूट बनवले आहेत. येत्या आषाढी एकादशीला उत्तरवार कुटुंब श्रींच्या चरणी हे सुवर्ण मुकूट अर्पण करणार आहेत.

उत्तरवार यांनी काही दिवसांपूर्वी देवाला हे मुकुट अर्पण करण्याचा संकल्प केला होता. हे दोन्ही मुकूट एकूण 1968 ग्राम शुद्ध सोन्यापासून बनविले गेले आहेत. त्यांची एकूण किंमत 1 कोटी 3 लाख रुपये आहे.

मे. विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार सराफ आणि जयश्री उत्तरवार यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र ओंकार, अरविंद, अजय, अच्युत आणि डॉ. अनंत उत्तरवार हे मुकुट अर्पण करण्यासाठी येणार आहेत. कोरोनाच्या सुरुवातीला विजयकुमार उत्तरवार ह्यांनी उमरी नगर परिषद, सरकारी दवाखाना आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही भरघोस देणगी दिली होती.