नांदेड – गुरुद्वारा बोर्डाच्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल

4692

 

वारंवार सुचना देवूनही गुरुद्वारा बोर्डाने भाविकांना गुरुद्वारात दर्शनासाठी प्रवेश देणे सुरुच ठेवले असल्याने बुधवारी गुरुद्वारा बोर्डाच्याअधिक्षकांसह दोन प्रशासकीय अधिकार्‍यांविरुद्ध वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने 17 मार्च रोजी एक परिपत्रक काढून धार्मिक स्थळावरील भाविकांची गर्दी टाळण्याच्या सुचना दिल्या होत्या. असे असतांनाही गुरुद्वारा बोर्डाने या सुचनेकडे दुर्लक्ष करत भाविकांना गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी प्रवेश देणे सुरुच ठेवले.सामाजिक अंतर पाळण्यात येत नसून प्रशासनाच्या सुचनेचे पालन न करता गर्दी करण्यात येत आहे. या विषयी गुरुद्वारा प्रशासनाला भाविकांची गर्दी
टाळण्याबाबत सुचना देवूनही गुरुद्वारा प्रशासनाने सुचनांची कुठलीच दखल न घेतल्याने गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक व अन्य दोन प्रशासकीय अधिकार्‍यांविरुद्ध राष्ट्रीय अपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड,
उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के व पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पुंगळे हे करीत
आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या