
नांदेड जिह्यातील एका गावात बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली. हा घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करत गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना त्यांची जागा दाखवावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार आहे. त्यांची केंद्र सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी आणि दिल्ली सरकारने त्यात लक्ष घालावे आणि त्यांना न्याय द्यावा असा ठराव महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत झाल्याचे पवार यांनी सांगितले.


























































