शनिवारपासून नांदेड-पनवेल एक्सप्रेस दररोज धावणार, असे आहे वेळापत्रक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्या शनिवार, 1 फेब्रुवारीपासून नांदेड-पनवेल एक्सप्रेस दररोज धावणार आहे. सदर रेल्वे या पूर्वी आठवड्यातून सहा वेळा धावत होती. आता ती बाकीच्या दिवसाप्रमाणे शनिवारी देखील नियमित वेळेप्रमाणे धावणार आहे.

  • गाडी (क्र. 17613 नांदेड-पनवेल एक्सप्रेस दररोज नांदेड येथून सायंकाळी 5.30 ला निघून पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.10 ला तर पनवेल येथे सकाळी 9 ला पोहोचणार आहे.

  • परतीत गाडी क्र 17613 पनवेल-नांदेड एक्सप्रेस पनवेल येथून दररोज सायंकाळी 4 ला निघून पुणे येथे रात्री 7.55 तर नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचणार आहे.

नांदेड-पनवेल रेल्वेमुळे प्रथमच मराठवाडा विभागातून पुण्याला दररोज जाण्याचे सोय लाभणार आहे. गाडी (क्र. 17614/17614) नांदेड-पनवेल-नांदेड गाड्यांची परभणी-लातूर रोड दरम्यानच्या दोन तासाचे लूज टाईम रद्द करून नांदेड येथून सदर रेल्वेला देवगिरीनंतर संध्याकाळी 7 वाजता सोडण्यात यावे तसेच परतीत पनवेल-नांदेड रेल्वेला पनवेल येथून सायंकाळी 4 ऐवजी 6 वाजता रवाना करून नांदेड येथे सकाळी 9 वाजेपर्यंत पोहोचविण्यात यावे. या शिवाय सदर रेल्वेला पनवेल येथून मुंबई सीएसटीपर्यंत वाढविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा. सुरेश नाईकवाडे, हर्षद शहा, शंतनू डोईफोडे, अ‍ॅड. केदार जाधव, दयानंद दिक्षीत रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, श्रीकांत गडप्पा, अमित कासलीवाल आदींनी केली आहे.