अर्थसंकल्पावरून काँग्रेस समर्थकांकडून मोदी सोशल मीडियावर ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-fail-lok sabha

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आज अर्थमंत्री पियूष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. लोकसभा निवडणुकीच्या आधीचा हा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. या अर्थसंकल्पात पाच लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरून कौतुक होत असतानाच काहींनी हा अर्थसंकल्प म्हणजे मोदी सरकारचा जुमला असल्याचे सांगितले आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी मोदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर ‘आखरी जुमला बजेट’ हा ट्रेंड सुरू झाला असून त्यात अनेकांनी मोदींच्या या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.