नरेंद्र मोदी मत चोरी करून सत्तेवर आले आहेत, माझ्याकडे सर्व पुरावे – राहुल गांधी

नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निवडणूक आयोगा मिळून संविधानावर हल्ला करत आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी मत चोरी करून सत्तेवर आले आहेत, त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत असेही राहुल गांधी म्हणाले.

आज पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी एक सादरीकरण दिलं की हरियाणातील निवडणुका या खर्‍या निवडणुका नव्हत्या. तिथे ‘व्होलसेल चोरी’ झाली. मी केलेल्या आरोपांवर, खोटं मतदान, खोटा फोटोंवर निवडणूक आयोगाकडून काहीच उत्तर आलं नाही. भाजप याचं समर्थन करत आहे, पण माझं म्हणणं चुकीचं ठरवत नाही. माध्यमं लहान उदाहरणं उचलत आहेत, जसं की एका ब्राझिलियन महिलेनं मतदान केलं. मग एका ब्राझिलियन नागरिकाच्या फोटोवर मतदान कसं झालं? वास्तविकता अशी आहे की नरेंद्र मोदी, अमित शहाजी आणि निवडणूक आयोग मिळून संविधानावर हल्ला करत आहेत. संविधान म्हणतं – ‘एक माणूस, एक मत’. पण हरियाणाने दाखवून दिलं की तिथं ‘एक माणूस, अनेक मते’ असं झालं. तेच आता बिहारमध्ये करणार आहेत. हेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि गुजरातमध्ये घडलं आहे. नरेंद्र मोदी हे मतचोरी करून सत्तेवर आले आहेत आणि याचे आमच्याकडे खुप सारे पुरावे आहेत असेही राहुल गांधी म्हणाले.