
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर गुडघे टेकले असून, हा करार म्हणजे हिंदुस्थानच्या आत्मसन्मानाशी केलेली तडजोड आहे,” अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते असे म्हणाले आहेत.
पवन खेरा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, “नरेंद्र मोदींनी हिंदुस्थानची अर्थव्यवस्था, शेती आणि आपले राष्ट्रीय हित एका ताटात वाढून ट्रम्प यांच्या हवाली केले आहे. हे पाहून कोणत्याही हिंदुस्थानाला अभिमान वाटणार नाही. जो हिंदुस्थान एकेकाळी अमेरिकेच्या बड्या नेत्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून व्यावहारिक संबंध जपायचा, तो हिंदुस्थान आज कुठे हरवला आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या करारामध्ये सामान्य नागरिकांच्या हिताचा बळी दिल्याचा दावा खेरा यांनी केला आहे. नरेंद्र मोदींनी अदानी आणि अंबानी यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडले आहेत, असे ते म्हणाले आहेत. “जे लोक या परिस्थितीला ढोल-नगाड्यांच्या गजरात उत्सवासारखे साजरे करत आहेत, परंतु त्यांनाही माहित आहे की हे सेलिब्रेशन नसून सरेंडर आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.






























































