देश फुकून मित्राचा फायदा करताहेत मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

केंद्रातील मोदी सरकार दोन्ही हातांनी जनतेची लूट करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देश फुकून आपल्या उद्योजक मित्रांचा फायदा करण्यात धन्यता मानत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. गॅस, पेट्रोल-डिझेलवर जबर करवसुली आणि सरकारी उद्योग विकून मित्रांच्या तिजोऱ्या भरण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. जनतेकडून रोजगार आणि सुविधा हिरावून घेणे आणि श्रीमंत उद्योजकांना मोठा लाभ मिळवून देणे हा पंतप्रधानांचा कायदाच बनला आहे, असा आरोप करीत राहुल गांधी यांनी पेट्रोल-डिझेलची अमर्याद भाववाढ आणि सरकारी कंपन्या, उद्योग विकायला काढणाऱ्या मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र आपल्या ट्विटमधून सोडले आहे.